Thursday, July 15, 2010

माझा एक थरारक अनुभव

मुंबईत असतानाकामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला..
खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते...

त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (सेकंडक्लासच्या) डब्यातून एक भरलेली गोणी धडपडली आणि
मग तिच्यावर गोष्टीतल्या उद्रांसार्ख समोरचा काही दिसत नसल्यासारख्या एकावर एक अजून गोण्या येऊन आदळल्या...आम्ही अर्थातच फिदीफिदी हसून घेतले...अजून एकदा मी गाडीत
चढताना अचानक कोणीतरी माझ्या पाठीत मारलं..मग मी संतापून दुसऱ्या एकीच्या पाठीत गुद्दा घातला...तिने पाहिलं आणि अजून मला मारायला धावली आणि मी पण प्रतिकाराच्या
पवित्र्यात उभी राहिले पण गाडी सोडायचा धोका आम्हाला असल्या फालतू कारणासाठी घ्यायचा नसल्याने ते तिथेच थांबलं...

असो, तर काय ? हं..माझा अनुभव ....झालं काय कि मी नेहमीप्रमाणे दादरात उतरायला म्हणून दारात उभी होते...
हि SSSSS गर्दी....तशातच गाडी थांबल्यावर मी उतरून घेतले पण....माझी पर्स कोणीतरी धरून ठेवली....इतर बायका मला धक्काबुक्की करून आत चढल्या आणि उतरल्या...मी आपली दारातच  एक हात दांड्याला धरून उभी...ती बाई काही पर्स सोडायला तयार नाही...तिला वाटलं असेल जीवाच्या भीतीने मी पर्स सोडून देईन...पण त्यात माझे त्यावेळेसचे २-३ हजार रुपये होते शिवाय बस पास ,ट्रेन पास अजून काही चिल्लर गोष्टी...तर मी काही पर्स सोडली नाही आणि तिनेपण ...लोकल चालू झाली ....मी पण एका हाताने दांडा धरून ठेवला आणि पळत पळत दुसऱ्या हाताने त्या बाईच्या हातावर गुद्दे मारायला सुरुवात केली...गाडीने वेग घेतला आणि मी पण...शेवटी तिने पर्स सोडली....

एवढं सगळं गर्दीने गजबजलेल्या दादरातल्या स्टेशनवर....ना गाडीतल्या दारात उभ्या असलेल्यांनी मदत केली ना फलाटावर उभे असलेल्या कोणी काही इंटरेस्ट दाखवला.....हा प्रकार
झाल्यावर मी आपली जसं काही झालंच नाही अशी दुसरी लोकल पकडायला निघून गेले आणि इतरांसाठी काही झालेच नसल्याने तसाही काही वाटण्याचा प्रश्न आला नाही..

तर असा हा माझा एक अनुभव.

Recovery

2 comments:

  1. बाप रे! खूप मोठा धोका पत्करलात. पण साहजिक आहे. आपली कष्टाची कमाई आणि महत्वाचे कागदपत्र ज्या पर्समधे आहेत, ती अशी सुखासुखी कोण सोडून देईल. लोकमधे असे थरारक प्रसंग घडतच असतात. पण बर्‍याचदा ज्याच्यावर हा प्रसंग गुदरतो, त्याला एकट्यालाच संघर्ष करावा लागतो.

    ReplyDelete
  2. झक्कास अनुभव........

    ReplyDelete