Tuesday, January 3, 2012

फुलके

तर सांगायची गोष्ट अशी कि मला फुलके फारसे आवडत नाहीत...जेवणातले हो. पोळी, फुलके, भाकरी, पुरी, पराठे, गाकर यातले फुलके.
मी दहावीनंतरच्या सुटीत एकाच्या घरी जेवायला होते तेव्हा फुलके केले होते...तीच पहिली ओळख. आम्ही लहान असल्याने आधीच वाढून दिलं होतं. गरम भाजी, साधं वरण भात अन हे फुलके अगदी तव्यावरून ताटात असे...मला आधी वाटलं सादळलेला पापडच आहे कि काय. दिवसभर उनाडक्या करून मस्त भूक लागलेली..एक दोन फुलके झाल्यावर "अजून देऊ का गं?" अशी प्रेमाची विचारणा झाली. भूकच लागल्याने "हो " म्हणाले...दोन घासात तो पण फुलका संपला...पुन्हा प्रेमाने विचारल्यावर मीच लाजून "नको " म्हणून वरण भात संपवून तशीच अर्धपोटी झोपायला गेले.

पोळी, भाकरी, पराठे,गाकर खाल्ल्यावर कसं शांत वाटतं. अन्नदाता सुखी भव!! हे न बोलताही समजतं. त्यातही भाकरी अन वांग्याचं भरीत...अहाहा!!! स्वर्गसुख! ते असो.
तेलकट्ट पुऱ्या फक्त बटाट्याच्या भाजीबरोबरच आवडतात. पराठे इथे एका पंजाब्याकडे खाल्ले तेव्हापासूनच आवडायला लागले. घरी एकदोन यशस्वी प्रयत्नहि करून झालेले आहेत. गाकर म्हणजे पोळीच पीठ म्हणजे भिजवलेला गोळा हातावर घेऊन जाडपैकी चपटे करायचे अन भाजायचे. व्यवस्थित जमले तर उत्तम लागतात नाहीतर कच्चे गोळे खावे लागतात..

असो, उगाच आपलं एक सुचलं म्हणून लिहिलं इतकंच.

Sunday, January 1, 2012

New Stuff!!



Currently I am busy making jewelry like earrings, bracelet, necklaces. Also making head pins with decorations for girls. I spoke with a lot of boutique owners and one person is ready to put my stuff in her store, so I am busy making different stuff for Feb. 2012 - Valentine's Day you know!!

I hope I get some sale.