हम्पी- विजयनगरचे साम्राज्य
मागच्याच वर्षी कर्नाटकातील हम्पी या ठिकाणी जाण्याचा सुयोग आला...हम्पी हि युनेस्कोची world heritage साईट आहे...कारण? कारण हम्पी हे शहर विजयनगरच्या साम्राज्याची खुण आहे..
विजयनगर साम्राज्य हे एक संपन्न साम्राज्य होते...हम्पी हि राजधानी होय..सगळीकडून मोठमोठ्या पाषाणांनी वेढलेले हम्पी हे शहर. या पाषाणावरच प्रचंड मोठमोठी आणि अतुत्तम दर्जाची दगडी कोरीव कामे केलेली मंदिरे उभारली. विठ्ठल मंदिर, अच्युतराया मंदिर, विरुपाक्ष मंदिर हि मुख्य मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिर अक्षरशः प्रचंड आहे...मंदिरात जाण्याआधी दोन्ही बाजूला प्रचंड मोठे दगडी छत असलेले corridor आहेत जिथे पूर्वी पूजेचे साहित्य, फुले, फुलमाला इ. विक्रेते बसायचे...विठ्ठल मंदिरात प्रवेश करतेवेळी तुम्हाला रस्त्याच्या बाजूला एक मोठ्ठे कुंड दिसेल...असे सांगतात कि येथे लोक क्रीडेसाठी जमायचे...प्रत्येक मोठ्या मंदिराजवळ असे लहानमोठे (खरेतर मोठे आणि मोठ्ठे ) कुंड आहेत...हे कुंड म्हणजे पूर्वीच्या सामुदाईक जागा होत...लोक तिथे जलक्रीडा करणे, भेटणे, गप्पा टप्पा इ. कारणाने भेटत..प्रत्येक कुंडच्या मध्यभागी एक उंच छत असलेला चौथरा आहे...
प्रत्येक म्हणजे शब्दशः प्रत्येक भिंत, खांब, छत, उंबरठा, सगळीकडेच सुंदर, नाजूक आणि अत्युत्तम दर्जाचे दगडी कोरीव काम केले आहे...रामायण, महाभारत इ. संदर्भ घेऊन हे काम केलेले आहे...