मनु चार वर्ष्यांची झाली तरी अजुन थोड़े बोबडेच बोलते.......सकाळी उठल्याबरोबर बड बड बड सुरु होते...."आई it's sunny day get up", " I am hungry", "I want breakfast cereal" असे चालू होते.....आपण उठले की मग तिची भूक संपते अणि लगेच खेळायचे असते.....
" अग आधी दात घास, मग नंतर खेळ "
"पण मला खेळायचय , आत्ता,"
"शाळेत जायचय की नाही छोट्या मुलांबरोबर खेळायला ? "
"नाही.......मला T. V वर thomas लाव....."
हे रोजचेच आहे.....पण थोडेसे distract केल्यावर विसरते....आणि अगदी उड्या मारत गाडीत बसते....बेल्ट तिलाच लावायचा असतो.....काहीही करायचे झाले की कसे करायचे हे माहिती नसतानासुद्धा "मी, मी, मला करायचय, मी करते" असे चालू असते......ऐकूनतर काहीच घेणार नाही.....आरडा ओरडा करुन कधी गोड गोड बोलुन हवे ते करुन घेते....पक्की ड्यम्बिस आहे......एवढासा जिव पण आवाज मात्र अख्या San Jose ला ऐकू जाइल......कधी कशाला नाही म्हंटले की कोठेही असलो तरी ठणाणा करणार....
सगळ्याच गोष्टींचे कौतुक वाटते......मैत्री तर अगदी कोणाही बरोबर करते.......स्वताहाच खेळायला जाइल....खुप मस्ती लागते दिवसभर....दमत कशी नाही कोण जाणे......दुपारीही कधीच झोपत नाही....काही ना काही उद्योग चालूच असतो....कोणतीही गोष्ट पटकन आत्मसात करते....पण मनात असेल तरच करणार....आपण कौतुकाने काही कर म्हंटले तर करेलच असे नाही.....अगदी मनिमाऊच आहे....
प्रचंड प्रेमळ आहे......रोज हजारवेळातरी मला " आई, I Love you " असे गळ्यात पडून म्हणनार........काहीही करत असली तरी बघत बसावेसे वाटते.....बागेत सायकल खेळायला तर खुप आवडते.......
रोज चार तास शाळेत जाते पण विचारले शाळेत काय केले तर " काही नाही" असे उत्तर तयार.......काही ना काही उद्योग शाळेतही चालूच असतात.......creative आहे.....शिकलेली गोष्ट पटकन practical मधे उतरवते.....A -Z तर दोन वर्ष्यांची असतानाच शिकली.....ते सुद्धा t .v वर सुपर व्हाय बघून......मला तर चौथी पाचवीपर्यंत इंग्रजी येत नव्हते......
असो....अगदी डोक्यावर नाही बसवणार पण तिच्या इच्छा ज्या आवाक्यात आहेत अणि योग्य वाटतात त्या निश्चितच पूर्ण करणार.....God belss her .....
chan lihites shilpa...keep it up...
ReplyDeletewachun agadi watla apanali lawkar aai whawa..god bless your baby & may she get all that you dream for her...
hey Shilpa, I feel I met your daughter through your post..Ekdam masta vatla..liked your style of writing..simple yet sensitive..keep up gal!
ReplyDeleteएकदम भावस्पर्शी लिखाण केलं आहे.
ReplyDeleteआवडलं.
पु.ले.शु.
chhan. :)
ReplyDeleteaavaDale likhan.
asech lihit raha.