मागच्या वर्षी आम्ही भारतात गेलो होतो...माझे आई वडील पनवेलात राहत होते...नवऱ्याचे CBD त ....मी पनवेलात गेले होते २ दिवसासाठी...दुसर्या दिवशी दुपारी माझ्या लेकीची शी धुवायला गेल्यावर माझ्या आईला दिसले कि किंचित लालसर आहे...कदाचित रक्त असेल म्हणून ताबडतोब डॉक्टरकडे जावे...मला काही एवढे विशेष आहे असे वाटले नाही पण आईने खूपच जोर केला म्हणून जवळच्याच क्लिनिक मध्ये जिथे बालरोगतद्न्य असते इथे गेलो...गेल्यावर कळले कि त्या इथे येत नाहीत...मग त्यांच्या क्लिनिक मध्ये गेलो...
क्लिनिक मध्ये गेल्यावर थोडा वेळाने बाई आल्या आणि तपासले...विचारले काही वेगळे खाल्ले पिल्ले का? "नाही, पण हे लोक हल्लीच भारतात आले अमेरिकेतून आणि बाळाची पहिलीच visit आहे ", माझी आई...मग मला विचारले तुम्ही बाळाच्या कोण ,"आई"...बरं...बाळाला gastro वाटतोय,admit करावे लागेल...फारसे सिरीयस नाही पण काहीही होऊ शकते...निर्णय तुमचा...मी घाबरले...नवर्याला फोन करून विचारले. आता फोनवर त्याला डॉक्टर admit कर म्हणतेय सांगितल्यावर तो होच म्हणणार...तर admit केले...त्याआधी private रूमचा भाव सांगून general पेक्षा बरे म्हणून रूम घेतली... हाताला सलाईन वगैरे लावले...मग नवरा आला..थोड्या वेळाने इतर लोकांशी बोलले तर कळले कि सगळ्यांना gastro साठीच admit केले आहे....बांर...
दुसर्या दिवशी डॉक्टरीणबाई आल्या आणि मला सांगायला लागल्या कि त्यांची वन्स अमेरिकेत आहे....त्यांना पण कसे अमेरिकेत जायला मिळत होते...पण नवर्याला तिथे operation करायला नाकारले म्हणून नवर्याने इथेच राहायचे ठरवले....नाहीतर कश्या त्या पण आत्ता अमेरिकेत असत्या...वगैरे...मला काही त्यांचा रंग ठीक वाटलं नाही...म्हणून बाळाला बरे वाटल्यावर लगेच discharge घ्यायचे ठरवले...डॉक्टर नाहीच म्हणत होत्या....पण विशेष काही नव्हते आणि gastro पण नव्हता मग कशाला ठेवायचे आणि CBD ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊया म्हणून discharge घेतला...
बिल आले....अक्षरशः अव्वाच्या सव्वा बिल लावले होते...आम्ही विचारायला गेलो..नवरा नकोच म्हणत होता...पण मी आग्रह केला...डॉक्टरीणबाई काय म्हणाली असेल? " तुम्ही अमेरिकेत राहता...तिथे किती बिल होते मला माहिती आहे...तिथल्यापेक्षा हे कमीच आहे...तुम्हाला काही हे जड नाही."
"आम्ही तुम्हाला द्यायला पैशे कमवीत नाही...तुम्ही इथल्याप्रमाणे बिल लावा." काही charges अव्वाच सव्वा होते ते सांगितले...तर त्या म्हणे कि मी तुम्हाला इतर बिल दाखवते...मी म्हंटल दाखवा...तर आम्ही तिथेच उभे आणि हि बाई खाली मान घालून काहीच बोलेना...म्हंटल हि काही दाखवणार नाही इतर बिल...
शेवटी आम्ही बाहेर आलो...मी नवर्याला म्हंटले हजारभर रुपये कमीच देऊ...उघडपणे ती बाई आपल्याला लुबाडतेय....हा पुळचट....काही नको..सगळे पैसे भर...अमुक तमुक...शेवटी मी वैतागले....पैसे काही मी कमवीत नाही...खड्ड्यात जा...माझ्याकडचे १०० रुपय काही दिले नाही..त्याने काय फरक पडनार...पण माझ्या मनाचे समाधान...
काही दिवसांनी तिथल्या सरकारी शाळेच्या कुंपणावर याच बाईची जाहिरात वाचली " फुकट तपासणी शिबीर. लहान मुलाची फुकट शारीरिक तपासणी करून घ्या. डॉ. स्वाती लिखिते".
बरोबर आहे...तपासणी फुकट आणि मग काहीतरी सांगून admit करायला सांगायचे. चांगला धंदा आहे.
hmm.. same thing happened to my sis, who is in Aurangabaad. "Hopeless world"
ReplyDeleteशिल्पाजी,
ReplyDeleteमी सीबीडी येथे मनपाचा वैद्यकीय अधिकारी आहे.... आपण उल्लेख केलेल्या नवाच्या कुणी बालरोगतद्न्य सीबीडी त तरी नाहिये.मनपाचा एम.ओ. म्हणून मला माझ्या परिसरातील सर्व डॊक्टर्स ची माहिती ठेवावी लागते... असो.
नवी मुंबई मनपा चे सेक्टर-२ येथे सुसज्ज नागरी आरोग्य केंद्र आहे..जेथे केस पेपरचे ५ रु.वगळता सर्व काही ( औषधे,तपासण्या,लसीकरण ) सर्व मोफ़त आहे.
आपण बाळाला ऎडमिट केलेल्या इस्पितळाचे नाव सांगितल्यास अधिक माहिती मिळेल. धन्यवाद.
डॊ.कैलास गायकवाड